मराठी सुविचार भाग - 3 [ Success Vichar ] - Shika Marathi

Sunday, July 5, 2020

मराठी सुविचार भाग - 3 [ Success Vichar ]


तुम्ही दररोज जेवढं स्वतःशी बोलत असतात तेवढं तुम्ही कुणाशीच बोलत नसतात, त्यासाठी दयाळूपणे, सकारात्मक गप्पा करत चला.

आपल्याला इतरांपेक्षा बुद्धिवान होण्याची गरज नाही आहे.
आपल्याला इतरांपेक्षा शिस्तप्रिय रहाण्याची आवश्यकता असते.

जर तुमच्याकडे प्रेम करण्याची पात्रता
आहे तर सर्वात आधी स्वतःवर प्रेम करायला शिका.

लोकांना तुमच्याबद्दल काय वाटते ते कदाचित तुमच्याकडे बोलून दाखवणार नाहीत पण ते नेहमी तुम्हाला त्यांच्या कृतीमधून दाखवून देत असतात. काळजीपूर्वक लक्ष असू द्या.

आपल्यात असणारी अपूर्णता पाहून कधीच निराश होऊ नका, कारण आपल्यातील दोषांची जाणीव झाल्यामुळेच आपले दोष कमी होत असतात.

जे लोक इतरांच्या दोषांचे तुमच्यापुढे वर्णन करत असतात ते तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्या व्यक्तीकडे करत असतात हे लक्षात असू द्या.

vip marathi suvichar

motivational quotes in marathi for success


७ गोष्टी ज्या तुमचं जीवन बदलवू शकतात :

संभाषण सुरू करणारे पहिले व्यक्ती बना -
        संभाषणाची सुरुवात जेव्हा तुम्ही करत असतात तेव्हा तुम्ही लहान बनत नाहीत.

नाही म्हणायला शिका -
        ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत त्या गोष्टीना नकार द्यायला शिकल्यामुळे तुमच्या जीवनातील ३०% तणाव नष्ट होतो.

संदेश किंवा इमेल्सला लगेच प्रतिउत्तर देऊ नका - 
        तुमचा मेंदू झटपट निर्णय घेण्यास काही वेळेस सक्षम असतो. काही वेळ वाट बघा किंवा प्रतिउत्तर देण्यासाठी एक वेळ ठरवा जेणेकरून तुम्हाला त्यात नंतर काही बदल जरण्याची आवश्यकता भासल्यास करता येईल.

मृत्यू हा अटळ आहे हे नेहमी लक्षात असू द्या -
        तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करत असतात तेव्हा असा प्रश्न स्वतःला विचारा की, आज जर माझा या पृथ्वीवर शेवटचा दिवस असेल तर मी हेच काम करणे पसंत करणार का?

सेवाक्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला आदर असू द्या -
        मग तो वेटर असेल, चपराशी असेल किंवा क्लर्क असेल किंवा कुणीही त्यांच्या आदरपूर्ण वागणूक असू द्या. स्मितहास्य चेहऱ्यावर असू द्या त्यांना त्यांच्याबद्दल चांगली टिप्पणी द्या पण ती खरी आणि मनापासून दिलेली असली पाहिजे. याचा तुम्हाला फायदा होतोच. 

ज्या गोष्टींची तुम्हाला अजिबात गरज नाही आहे अशा गोष्टी विकत घेणे टाळा -
        एखादी महागडी गोष्ट तुम्हाला विकत घेण्याची इच्छा मनात निर्माण होते पण त्याआधी किमान ३ दिवस प्रतीक्षा करा, आणि त्या ३ दिवसात तुम्हाला असे जाणवले की खरंच मला या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे. तरच त्या गोष्टीची खरेदी करा.

शिकण्यासाठी नेहमी तयार रहा-
        शिकतांना तुमचा अहंकार बाजूला ठेवा. तुमचे मुलं किंवा कुणीही ज्याला तुम्ही अगदी हलकट समजतात अशी लोक तुम्हाला जीवनात मोलाचे धडे शिकवू शकतात.

ईश्वर हा खूप दयाळू आहे तो कुणालाच शिक्षा देत नसतो, पण तुमच्या कर्माची फळे मात्र तुम्हाला नक्कीच आज ना उद्या भोगावीच लागतात. 

 आपले कर्म चांगले असू द्या

जर तुम्ही तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ नसाल तर तुम्ही असा विचार कसा करू शकतात की तुम्ही अजून काहीतरी मिळवल्यावर आनंदी व्हाल? 

आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आपण नेहमीच कृतज्ञ असायला हवं

असे काही लोक असतात ज्यांचं शिक्षण तुमच्यापेक्षा कमी असतं आणि ते असे काहीतरी करत असतात की जे करायची तुम्ही इच्छा होती.

कसकाय?

त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली म्हणून.

स्वतःवर विश्वास असू द्या मित्रानो

good thoughts in marathi

Share with your friends

Related Posts

Add your opinion
Disqus comments
Notification
This is just an example, you can fill it later with your own note.
Done